पालकमंत्री दादा भूसे यांनी बंगल्यात शिरून दरोडेखोराला पकडुन काय केले ?
मालेगाव बाह्यचे आमदार पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरास दरोडा टाकण्याआधीच जेल हवा खावी लागली आहे
मालेगाव शहरातील कलेकटर पट्टा भागातील बंगल्यात ही घटना घडली. चोरट्याने बनावट बंदुकीचा धाक दाखवत (Showing The Fear of Gun) दागिने आणि पैशांची मागणी करत महिलेवर धारदार कैचीने तर मुलीस चावा घेतला. या घटनेने हादरलेल्या दोघा मुलींनी घराबाहेर धाव घेऊन आरडाओरड करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दरोडेखोराने पळवून न जाता महिलांना बंदुकीचा धाक दाखवत दागिने आणि पैसे काढून देण्याची मागणी केली. याच भागातून जाणारे पालकमंत्री दादा भूसे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ बंगल्यात शिरून दरोडेखोराला पकडुन मालेगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
मालेगाव शहरातील ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट विक्रेते मितेश विनोद दोशी यांचा जैन स्थानकच्या पाठीमागे बंगल्यात दुपारच्या सुमारास दुकानातून एक मॅकेनिक बंगल्यावर पोहोचून दरवाजा वाजवला. मुलीने दरवाजा उघडला असता पप्पांनी पाठवले आहे, असे त्याने सांगितले. म्हणून त्याला घरात प्रवेश देण्यात आला. पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावून दागिने आणि रोकड काढण्यास सांगितले. घरातील सदस्यांनी आरडाओरड करताच परिसरातील रहिवासी बंगल्याकडे धावून आल्याने चोरट्याने पळून जाऊन दरवाजा लावून घेतला.
टेरेसवरून चोरटा खाली येत नसल्याने अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार यांच्यासह जवानांना पाचारण करण्यात आले होते. बंगल्याच्या बाहेर संतप्त जमाव जमल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दादा भुसे यांनी शेजारच्या बंगल्याच्या टेरेसवर जाऊन ‘तुला कुणी मारणार नाही, पोलिसांच्या स्वाधीन होऊन जा, अशी ग्वाही दिल्याने चोरटा खाली आला. त्यास मालेगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. मंत्री दादा भुसे यांच्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरांना पकडण्यात यश आल्याने भुसे यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.