नागपूर : भाजपतर्फे स्वातंत्र्य वीर सावरकर गौरव यात्रा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नागपूर : भाजपतर्फे शहराच्या सहा विधानसभा मतदारसंघात आज (दि.४) सायंकाळी स्वातंत्र्य वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आल्या.

यावेळी काढलेल्या सर्व बाईक रॅलीचा समारोप वाहने निर्धारित ठिकाणी पार्किंग झाल्यानंतर शंकरनगर चौक येथे सावरकर यांच्या पुतळ्यासमोर होणार आहे. या रॅलीत तसेच सभास्थळी प्रत्येक नेते, पदाधिकारी मी सावरकर अशी टोपी डोक्यावर घालून उपस्थित होते.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्टीय प्रवक्ते सुधानशू त्रिवेदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदीसह सर्व आमदार, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

एकीकडे भाजपने स्वातंत्रवीर सावरकर यांच्या अवमानाचा मुद्दा ऐरणीवर आणला असतानाच काँग्रेसने उत्तर नागपुरात भाजपच्या धोरणाविरोधात, राहुल गांधी यांचे समर्थनात जाहीर सभा ठेवली आहे. भाजपने आज या यात्रेचे होर्डिंगस लावताना कल्पकपणे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण यांचे सावरकरांविषयीचे कोटेशन्स प्रकर्षाने फोटोसह वापरले आहेत. एकीकडे तुम्ही अपमान करता पण तुमच्याच आजीने या देशभक्ताविषयी कसा आदर व्यक्त केला हे दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केल्याची माहिती गौरव यात्रा समितीचे प्रमुख माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली.