संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच तिन्ही पक्षांची दिसणार वज्रमूठ

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सभाजीनगर : ( आशोक कुंभार )संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिल्यांदाच संयुक्त सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासह आघाडीचे अनेक नेते संबोधित करणार आहेत.
ही सभा ऐतिहासिक अशा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार असून संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच मविआची सभा होत आहे. त्यासाठीची सगळी तयारी झाली असून वज्रमूठ टॅगलाईन असणारे बॅनर्स सभेच्या स्टेजवर लावण्यात आले आहेत. येथे उद्धव ठाकरे यांचे बॅनर मध्यभागी असून एकीकडे सोनिया गांधी, शरद पवार आणि दुसरीकडे अजित पवार नाना पटोले यांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षाचे नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.