पोलीस शिपाई पदांची लेखी परीक्षा; निकाल सोमवारी घोषित होणार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अमरावती : (आशोक कुंभार )शहर पोलिस आयुक्तालय व ग्रामीण पोलिसांतर्फे रविवारी सकाळी ८:३० ते १०:३० या वेळात पोलिस शिपाई या पदाकरीता लेखी परीक्षा घेण्यात आली शहर पोलिस भरतीसाठी २० पदाकरीता २२२ उमेदवार परीक्षेसाठी पात्र झाले होते, तर ग्रामीण पोलिस भरतीसाठी १५६ पदाकरीता १८६३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले होते. या पात्र उमेदवाराच्या लेखी परीक्षेसाठी शहरात चार ठिकाणी परीक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आले होते.

तसेच, शहर पोलिस आयुक्तालयासाठी एका ठिकाणी परीक्षा केद्रांचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर उमेदवाराशिवाय कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परीक्षा केंद्रावर नेण्यास बंदी होती. यावेळी शहर पोलिसांतर्फे तपासणी करूनच त्यांना केंद्रावर जाऊ दिले. परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी ही परीक्षा इन कॅमेरा घेण्यात आली. ग्रामीण पोलिस शिपाई या पदांचा निकाल सोमवारी घोषित होणार आहे.