क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र
भिवंडीत तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/03/Screenshot_2023-03-03-16-04-42-66_a71c66a550bc09ef2792e9ddf4b16f7a.jpg)
भिवंडी: (आशोक कुंभार ) येथील कोनगाव भागात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविद कांबळे (३५) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
कोनगाव येथील गावदेवी मंदीर परिसरात गोविंद काबंळे वास्तव्यास होते. बुधवारी त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला. घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, कांबळे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.