7.1 C
New York
Saturday, December 9, 2023

Buy now

आठ वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार

spot_img

अमरावती:(आशोक कुंभार ) आठ वर्षीय चिमुकल्यावर एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा अश्लाघ्य प्रकार गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हददीत उघडकीस आला.
१ मार्च रोजी दुपारी १ ते ६.३० या कालावधीत तो प्रकार घडल्याची तक्रार पिडितच्या पालकांनी नोंदविली. त्यावरून पोलिसांनी पंकज लोणावरे (रा. बजरंगनगर) या संशयिताविरूध्द अनैसर्गिक अत्याचार व चुकीच्या कृ्त्य करण्यासाठी बळजबरीने थांबविण्याचा गुन्हा दाखल केला.

गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक आठ वर्षीय चिमुरडा १ मार्च रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास खेळून घरी परतला. त्यावेळी काही मुले देखील त्याच्यासोबत त्याच्या घरी आली. त्यावेळी भेदरलेल्या स्थितीत असलेल्या पोटच्या गोळ्याला नेमके काय झाले, तो असा का, अशी विचारणा पालकांनी त्याच्या सोबत आलेल्यांना केली.

त्यावेळी पिडित चिमुरड्याच्या एका मित्राने घटना विषद केली. आम्ही पतंग खेळत असताना पंकज नामक इसम आमच्याकडे आला. त्याने पिडित मुलाला त्याच्या मोबाईलमध्ये गेम लावून दिला. चिमुरड्याच्या तोंडाला रुमाल लावून एका घरात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा सर्व घटनाक्रम ऐकून पिडितचे पालक आरोपीच्या घरी गेले. मात्र तो तेथे आढळून आला नाही. मात्र आरोपीचे नाव पंकज लोणावरे असे असल्याची माहिती त्यांना आरोपीच्या शेजाऱ्यांकडून मिळाली. याबाबत २ मार्च रोजी पहाटे २.४५ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles