आत्महत्त्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नाशिक : तरुणीशी जवळीक साधून तिचे विविध अवस्थेतील फोटो काढले. तसेच तिचा ठरलेला विवाह मोडण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीच्या जाचाला कंटाळून गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या करण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणास आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व १५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
शिवाजी प्रभाकर केदारे (४५, रा. गजानन रो हाऊस,खर्जुल मळा, सिन्नर फाटा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी केदारे याने फिर्यादीच्या मुलीशी जवळीक साधून तिचेसोबत विविध अवस्थेतील फोटो काढून त्या फोटोवरून तिच्यावर दबाव आणून मारहाण केली.

तसेच, तिच्या भावास मारण्याच्या धमक्या देत तिचे लग्नही मोडण्यास कारणीभूत ठरला. या जाचाला कंटाळल्याने फिर्यादीच्या मुलीने २ जून २०१९ रोजी दुपारी गोदावरी नदीपात्रात उडी घेत आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला होता.
सदरची गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक एन. व्ही. पवार यांनी करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायधीश एम.ए. शिंदे यांच्यासमोर खटल्याचे कामकाज होऊन प्रत्यक्ष साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपी केदारे यास सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १५ हजारांची शिक्षा ठोठावली आहे.

सरकारी पक्षातर्फे ॲड. आर. एम. बघडाणे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून महिला नाईक आर. एस. आहेर, सहायक उपनिरीक्षक के. एस. दळवी, महिला कॉन्स्टेबल एम.एस. सांगळे यांनी पाठपुरावा केला