वायुसेनेत लवकरच सुरु होणार अग्निवीरांची भरती

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई:हवाई दलात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आली आहे. भारतीय हवाई दलाने अग्निवीर वायु च्या नवीन भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे त्याअंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहेत. या पदभरतीसाठी नक्की कोण पात्र असणार आहेत आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे जाणून घेऊया. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वायुसेना अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 17 मार्चपासून सुरू होईल.

आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असेल. त्यानंतर 20 मे पासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज सबमिट करावा.
उमेदवार करू शकतात अप्लाय ज्या उमेदवारांनी 12वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह 50% गुण मिळवले आहेत ते अर्ज करू शकतात.
किंवा उमेदवाराकडे तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविका पदवी असावी. आणि इतर विषयांसाठी, कोणत्याही विषयात 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
इतकं वय असणं आवश्यक अग्निवीर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराची जन्मतारीख
शारीरिक क्षमता भरतीसाठी विहित शारीरिक पात्रतेनुसार, पुरुष उमेदवारांची उंची किमान 152.5 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांची उंची 152 सेंटीमीटर असावी. निवड प्रक्रिया भरती अंतर्गत, उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.