प्रवाशाकडील सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरीला, स्वारगेट एसटी स्थानकातील घटना

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


स्वारगेट ते बोरिवली असा प्रवास करणार्‍या तरुणाकडील 3 लाख 33 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना 20 फेब्रुवारीला दुपारी पावणेदोनच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात घडली याप्रकरणी विक्रम पवार (वय 22 रा. कांदीवल, मुंबई ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रम हे कामानिमित्त पुण्यात आले होते. त्यानंतर ते सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात आले. शिवनेरी बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी बॅग ठेवली असता, चोरट्यांनी त्यांची बॅग चोरुन नेली. त्यामध्ये लॅपटॉप, दोन चांदीच्या अंगठ्या, मोबाइल असे साहित्य होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करीत आहेत.