शिवसेनाभवन उद्धव ठाकरेंच्या नावावर? मनसे नेत्यानं ‘तो’ कागदच आणला..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : शिवसेना पक्ष कार्यालय व शिवसेना भवन शिंदे गट दावा करण्याची शक्यता आहे.

अशातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांशी शिवाई ट्रस्ट हे उद्धव ठाकरे यांच्या नावावर असल्याचा दावा केला आहे. पक्षचिन्ह आणि नाव गेल्यामुळे ठाकरे गट मोठ्या अडचणीत सापडला आहे. नुसते पक्षचिन्हच नाहीतर शिवसेनाभवन, शिवसेना शाखा, शिवसेना कार्यालय आपल्या ताब्यातून जाणार का? असा प्रश्ननिर्माण झाला आहे.

त्यामुळे ठाकरे गटाकडून बचाव सुरू झाला आहे. अशातच शिवाई ट्रस्ट हे उद्धव ठाकरे यांच्या नावावर असल्याचे समोर आलं आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून याबद्दल खळबळजनक दावा केला आहे.

‘शिवसेनाभवन शिवाई ट्रस्टच्या मालकीच आहे.

त्या ट्रस्टवर कधीही बाळासाहेबांनी आपलं नाव टाकलं नव्हतं मात्र उद्धव ठाकरेंना या ट्रस्टवर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी नाव टाकलं का? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थितीत केला आहे. (…अन् ठाकरे गटाने अखेर धनुष्यबाण चिन्ह हटवलं, नावही काढलं) आधीच स्मारकात घरच्यांची नाव टाकली आहेत, त्यात हे देखील समोर येत आहे, तर उद्धव ठाकरे फक्त प्रॉपर्टी जमा करत होते. त्यांच लक्ष फक्त प्रॉपर्टी जमा करण्यात आहे.

बाळासाहेब यांनी सांगितलं सर्व करता येतं पण गेलेलं नाव करता येत नाही, असा टोलाही देशपांडेंनी ठाकरेंना लगावला. शिवाई ट्रस्ट कुणाकडे? मुंबईमध्ये शिवसेनेच्या जवळपास 480 पेक्षा जास्त शाखा आहेत. दादर शिवाजी पार्कसारख्या प्राईम लोकेशनवर शिवसेना भवन आहे. शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा या शिवाई ट्रस्टच्या मालकीच्या आहेत.

शिवाई ट्रस्टचं मुख्य कार्यालय शिवसेना भवनमध्येच आहे. शिवाई ट्रस्टवर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि दिवाकर रावते हे ट्रस्टी आहेत.