कशी उडाली झोप? 61 वर्ष झोपलाच नाही ‘हा’ व्यक्ती,शांतपणे झोपावे, अशी इच्छा आहे.

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


झोपण्याची आहे इच्छा

एनजोक यांना ग्रीन टी प्यायला आवडते. ते आहाराची खूप काळजी घेतात. ते वाईनचेही शौकीन आहेत. पण त्यांना एक कमतरता काय जाणवते की, ते इतरांप्रमाणे शांत झोपू शकत नाहीत. एनजोक यांची इच्छा आहे की, त्यांना एकदा तरी शांतपणे झोपता यावं.

निरोगी आरोग्यासाठी आहार आणि झोप (Sleep) यांच्या समतोल राखणं आवश्यक आहे.

समतोल बिघडला तर, आरोग्याच्या समस्या उद्भवतात. पुरेशा प्रमाणात झोप घेणंही अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा कामामुळे किंवा ताणतणावामुळे आपल्याला निद्रानाश या समस्येला सामोरे जावे लागते. पण जर तुमची झोप कायमचीच उडाली तर… जगात असाही एक व्यक्ती आहे, ज्याची झोप कायमची उडाली आहे. या व्यक्तीला झोप येत नाही. एका व्यक्तीने दावा केला आहे की, तो गेल्या 61 वर्षांपासून झोपलेला नाही.

61 वर्ष झोपलाच नाही ‘हा’ व्यक्ती

80 वर्षाच्या थाय एनजोक (Thai Ngoc) या आजोबांनी दावा केला आहे की, ते मागील 61 वर्षांपासून झोपलेले नाहीत. व्हिएतनाममध्ये राहणारे थाय एनजोक (Thai Ngoc) Sleepless Man म्हणून ओळखले जातात. एनजोक यांनी सांगितले की, त्यांना लहानपणी एका रात्री ताप आला होता, त्या रात्रीनंतर ते आजतागायत झोपलेले नाहीत. एनजोक यांच्या दावा आहे की, ते 1962 पासून झोपूच शकले नाहीत, जागेच आहेत. एनजोक जगातील कदाचित पहिलेच व्यक्ती असतील, ज्यांना झोप येत नाही. दरम्यान, असं असलं तरीही त्यांचीही इतरांप्रमाणे शांतपणे झोपावे, अशी इच्छा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 1962 पासून एनजोक यांची झोप कायमची निघून गेली. अनेक दशकांपासून त्यांची पत्नी, मुले, मित्र किंवा शेजाऱ्यांनाही ते झोपलेले दिसले नाहीत. अनेक लोकांनी त्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही त्यांचा दावा खोटा ठरवू शकलेले नाहीत.

एनजोक तंदुरुस्त आहे. ते सकाळी वॉकला जातात आणि मेहनतीचं कामही करतात, मात्र निद्रानाशाचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झालेला नाही.