बीड डॉ.सुधीर ना.सावळे यांचा सत्कार संपन्न,

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


डॉ.सुधीर ना.सावळे यांचा सत्कार संपन्न,

बीड (प्रतिनिधी) :- शहरातील बशीरगंज येथील सुप्रसिद्ध आयडियल डेंटल क्लिनिक चे डॉक्टर सुधीर ना.साळवे यांचा सामाजिक कार्यकर्ते इसा खान व पठाण अमरजान यांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला.
असे की शहरातील बशीरगंज येथील सुप्रसिद्ध आयडियल डेंटल क्लिनिक चे डॉक्टर सुधीर ना.साळवे हे गेल्या तेवीस वर्षापासून दंत वैद्यकीय क्षेत्र मध्ये सर्वसामान्यांसाठी सेवा पूर्वीत आहे. सुरुवातीला शहरातील कारंजा चौक येथे सहा वर्ष तर बशीरगंज येथे आयडियल डेंटल क्लिनिक च्या माध्यमातून सोळा वर्षापासून सर्वसामान्य साठी
सेवापूर्वीत आले आहे त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी डॉ.सौ.रेश्मा सुधीर साळवे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
डॉ.सुधीर ना.साळवे यांना एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री पुरस्कार मेडियुष या दंत वैद्यकांच्या संघटनेच्या वतीने दंत वैद्यक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दि. ०१ फेब्रुवारी रोजी राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बेस्ट कॉस्मेटिक डेंटिस्ट या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते इसा खान व पठाण अमरजान यांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला यावेळी शेख शकील,सय्यद जावेद, तारेख चाऊस,शेख तालेब सह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.