ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

मेट्रोत झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर चढला उंदीर, अन् पुढे पाहा Video


दैनंदिन जीवनात लोक लोकल साधनांने प्रवास करत असतात. मग ते बस असो रिक्षा किंवा रेल्वे. धावपळीच्या जीवनात आराम करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने अनेक लोक प्रवासादरम्यान आराम करताना दिसतात.मात्र प्रवासादरम्यान आराम करताना अनेकांचे मजेशीर व्हिडीओ पहायला मिळत असतात. काहींसोबत तर विचित्र प्रकारही घडत असतात. सध्या एका प्रवाशाचा लोकलमधील व्हिडीओ व्हायरल होतोय. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, लोकलमध्ये एक व्यक्ती आरामशीर झोपलेला आहे.

अचानक तेथे एक उंदीर येतो आणि त्याच्या अंगावर चढतो. उंदीर व्यक्तीच्या पायापासून त्याच्या मानेपर्यंत सगळीकडे रेंगाळताना दिसत आहे. त्याच्या अंगावर काही विचित्र हालचाल जाणवते आणि तो मानेकडे हात फिरवतो तेव्हा उंदीर तिथेच बसलेला असतो. त्याचा हात लागल्यावर उंदीर पळून जातो.

लोकलमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट येत आहेत. अनेक ठिकाणी लोकलमध्ये, दुकानांमध्ये असे उंदीर फिरत असतात. नेटकऱ्यांनीही व्हायरल व्हिडीओखाली उंदरीचे बरेच व्हिडीओ टाकले आहेत. त्यामुळे काय तुमचे हात स्वच्छ धुवत असंही नेटकरी सल्ला देत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर असे प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे उंदीर बऱ्याच ठिकाणी रेंगाळताना पहायला मिळतात. प्रवाशासोबत असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button