क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

चक्क सापाला KISS करायला गेला तरुण; असा चावला की… थरकाप VIDEO


एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक तरुण चक्क सापाला किस करायला गेला. त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल.सापाला किस करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. नको ती हिरोगिरी त्याच्या अंगाशी आली आहे. जसं त्याने सापाला किस केलं तसा साप त्याला अशा ठिकाणी चावला की तो पुरता हादरला. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका तरुणाने सापाला आपल्या हातात पकडलं आहे. इतक्यात एक तरुण उत्साहात त्या सापासमोर येतो. गुडघ्यावर बसतो आणि त्या सापाला किस करायला जातो. सापाच्या तोंडाजवळ आपलं तोंड नेत तो सापाला किस करतो.

शेवटी साप तो साप. त्यानेही आपलं रूप दाखवलंच. जसं तरुणाने त्याला किस करण्याचा प्रयत्न केला तसा सापानेही दंश केला. त्याच्या तोंडावरच तो चावला.

तेव्हा मात्र हिरोगिरी करत सापाला किस करायला गेलेला हा तरुण पुरता हादरला. सापाने हल्ला करताच तो खाली कोसळला.

त्यानंतर घाबरून कसाबसा उठला आणि तिथून सापापासून दूर पळाला. यावेळी तरुणाच्या हातातील सापही खाली पडला आणि तो पळण्याचा प्रयत्न करू लागला. व्हिडीओत पुढे तरुण त्या सापाची शेपटी पकडलेला दिसतो. शेपटी धरलेली असल्याने सापाला पळता येत नाही.

थोड्या वेळाने तरुण शेपटी सोडतो, तसा सापही पुढे पळून जातो. तरुण त्याच्या मागेमागे जाताना दिसतो.
व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @reportersfact ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button