बीड कापसाच्या पिकात गांजाची लागवड आरोपी पसार..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड: (कडा) बीड-कडा-नगर राष्ट्रीय महामार्गापासून आठ किलोमीटर अंतरावर बाळेवाडी येथे शेतात कपासीच्या पिकात १०० गांजाची झाडे आढळून आली.
बीड येथील स्थानिक गुन्हे शाखा व अंभोरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ७० किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास बाळेवाडी शिवार येथे करण्यात आली.

आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील हनुमंत अर्जुन पठारे याने स्वतःच्या शेतात कापसाच्या पिकात गांजाची लागवड झाडे केली होती. याबाबत गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा बीड व अंभोरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या संयुक्त कारवाई करत बाळेवाडी शिवारातील शेतात कपाशी पिकात १०० झाडे लावल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी एकूण ७० किलो वजनाचा गांजा जप्त केला. याप्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे याच्या फिर्यादीवरून हनुमंत अर्जुन पठारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी पसार असून पुढील तपास अंभोरा पोलिस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत , अंभोरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने, एएसआय वचिष्ठ कांगणे, पोलिस नाईक अमोल ढवळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबुराव तांदळे, शिवदास केदार, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, रामदास तांदळे, विकास वाघमारे, अतुल हराळ, अशोक कदम यांनी केली.