ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

अरे गोपीचंदा काय बोलतो – अजित पवार


महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही चांगलं काम केलं आहे. पण काहींनी गद्दारी केली. त्यानंतर आमचं सरकार गेल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं.
ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आता काहीजण गरळ ओकत आहेत. मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी महिलांबद्दल गरळ ओकली. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी राज्यपाल चुकीचे बोलले. अफजलखानाने शिवाजी महाराजांचा कोथळा काढला असे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणतात. अरे गोपीचंदा काय बोलतो. आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे, असे म्हणत अजित पवारांनी त्यांच्यावर टीका केली.एकनाथ शिंदे सुटले कसे पळाले

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्ही चांगलं काम केलं आहे. पण काहींनी गद्दारी केली. त्यानंतर आमचं सरकार गेलं. आता काही वाचाळवीर बोलू लागले आहेत. काहीजण गरळ ओकत असल्याचे अजित पवार म्हणाले. कोणाही सत्तेचा माज करु नये असेही अजित पवार म्हणाले. मागे मंत्री मंगलप्रभात लोढा बोलले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तावडीतून सुटले. सुटले कसे एकनाथ शिंदे पळाले. आधी सुरत मग गुवाहाटी, मग परत रेडा अस ऐकलं त्यानंतर जोतिषाला हात दाखवल्याचा टोला अजित पवारांनी लगावला.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा अजित पवारांनी घेतला समाचार

आपण शिक्षणाला देणगी दिली म्हणतो. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात भीक मागितली. तुम्ही काय बोलता? तुम्ही आमच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. त्यामुळं आमची का बदनामी करता? असा सवाल अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांनी केला.

शेतकऱ्यांना पैसे मिळू द्या

आपल्याकडे साखरेला 3 हजार 100 ते 3 हजार 200 चा दर दिला जातो. परदेशात तीच साखर 3 हजार 900 ते 4 हजार रुपयांनी विकली जाते. आमच्या शेतकऱ्यांना मिळू देत ना पैसे असेही अजित पवार म्हणाले. मागच्या वर्षीची साखर अजूनही शिल्लक आहे. त्याला रोज एक रुपयाचे व्याज लागत असल्याचे पवार म्हणाले.आपला दीड लाख रोजगार निर्माण करणारा कारखाना गुजरातला नेला. ज्या पद्धतीने काम करायचे त्या पध्दतीने सरकार काम करत नसल्याचे अजित पवार म्हणाले.

बाकी सगळे कारखाने चालत आहेत मग भीमा पाटस कारखाना का चालत नाही?

आज भीमा पाटस कारखान्याची काय अवस्था झाली आहे. बाकी सगळे कारखाने चालत आहेत, मग हा कारखाना का चालत नाही? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. या कारखान्याला जिल्हा बँकेने 38 कोटींची मदत केली असल्याचे अजित पवार म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button