ताज्या बातम्या

चुलते पुतणे अपघातात जास्त मार लागल्यामुळे ठार


नाशिक पुणे महामार्गावर आज सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान माळवाडी येथील संजय विठोबा आव्हाड वय 50 व विजय शिवाजी आव्हाड वय 24 दोघे राहणार माळवाडी शिवाजीनगर बेगेवाडी हे दोघे चुलते पुतणे सिन्नर येथून घरी परतत असताना घराजवळच वळणावर आल्यानंतर सिन्नरच्या बाजूने येणाऱ्या ट्रक क्रमांक Mh19z 564 ह्या गाडीने मोटरसायकल क्रमांक Mh15 ce7427 ह्या दुचाकी स्प्लेंडरला धडक दिली.सदरचा ट्रक चालक अपघात ग्रस्त ट्रक सोडून फरार झाला.मात्र मोटरसायकल वरील दोघेही चुलते पुतणे सदरच्या अपघातात जास्त मार लागल्यामुळे ठार झाले. हा प्रकार समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेऊन अपघातातील जखमींना तातडीने सिन्नर येथे उपचारासाठी नेले मात्र दोघांची प्राणज्योत मालवली होती.

सदरच्या अपघाताची माहिती कळताच संपूर्ण माळवाडी गावावर शोककळा पसरली. अपघातामुळे एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे सदरच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला असून संजय आव्हाड यांच्या पश्चात दोन मुले, मुली, भाऊ, आई-वडील, पुतणे असा परिवार असून पुतण्या विजय आव्हाड याचेही एका वर्षापूर्वीच लग्न झालेले आहे.

सदरच्या अपघाताने आव्हाड कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे. सदरच्या गटाची माहिती मिळताच नांदूर पोलिसांनी जागेवर जाऊन पंचनामा केला असून, अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नांदूर पोलीस स्टेशनचे प्रवीण अडांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button