महाराष्ट्र

शासनाने लिपिक आणि टंकलेख पदांची मेगा भरती


राज्य शासनाने लिपिक आणि टंकलेख पदांची मेगा भरती करण्यासाठी नुकताच निर्णय घेऊन त्याबाबत एमपीएसीला माहिती सादर करण्यासाठी सर्वच विभागांना १५ डिसेंबरपर्यंत माहिती मागविली आहे. ही माहिती संग्रही करण्यास सुरुवात होते न होते तोच राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी २९ नोव्हेंबरला स्वतंत्र पत्र काढून तलाठी संवर्गातील ३१ डिसेंबर २०२२ रोजी रिक्त होणारी १०१२ पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे, असे एकूण ४१२२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.त्यासाठी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण व समांत आरक्षण निहाय आणि जिल्हा निहाय तपशीलाची मागणी केली आहे. राज्य शासाने १४ विभागांची रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील एमपीएससीमार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहीरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार असल्याने आयोगाकडे वेळेत माहिती पाठविण्याबाबत स्पष्ट आदेशही दिले आहेत. आता या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातारवण पहायला मिळत आहे.नाशिमध्ये सार्वधिक १०३५ तर अमरावती विभागात १८३ जागा येत्या १५ दिवसांमध्ये माहिती देणे आहे बंधनकारक सर्वच माहिती विहीत नमुन्यात विवरण पत्रात भरुन जिल्हानिहाय प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त करुन १५ दिवसांत सादर करण्याचे आदेशही दिले आहे. त्यामुळे आता सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना वेळेत माहिती देण्याचे आदेश दिले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांचे पदे ही रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे भरल्यास शासनाने काम गतीमान होऊन शेतकरी तसेच नागरिकांचे प्रश्नही यामुळे सुटणार आहेत. या निर्णयाचे आता सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

आैरंगाबाद विभागात आहेत ८४७ जागा नाशिक १०३५ आैरंगाबाद ८४७ कोकण वि. ७३१ नागपूर ५८० अमरावती १८३ पुणे ७४६ एकूण ४१२२

नाशिक विभागातील जिल्हानिहाय जागा जिल्हा रिक्त पदे नाशिक २५२ धुळे २३३ नंदुरबार ४० जळगाव १९८ अहमदनगर ३१२ एकूण १०३५

महसूल उपायुक्त असतील समन्वयक अधिकारी ही माहिती शासनाला पाठवण्यासाठी विभागीय आयुक्तालयातील महसूल उपायुक्तांना समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वच जिल्ह्यांची माहिती व्यवस्थित तपासून खास दूतावासाद्वारे शासनास पाठवण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांना कामाला लागावे लागणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button