क्राईम

हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची घटना


भोपाळ : लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या श्रद्धा वालकरची तिचा पार्टनर आफताब पूनावालाने हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशात असा प्रकार उघडकील आला आहेबहिणीशी प्रेमसंबंध असल्यावरून एकाने व्यावसायिक भागीदाराची हत्या केली व मृतदेहाचे ८० तुकडे करून ते रिवा जिल्ह्यातील दूधमतिया जंगलात फेकून दिले होते. श्रद्धाच्या हत्येची उकल होण्यास सहा महिने लागले होते तर मध्य प्रदेशातील हत्याकांडाची उकल होण्यास वर्ष उलटले.

पश्चिम बंगालमध्येही दारुड्या तरुणाने आपल्या वडिलांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचे अलीकडेच उघडकीस आले होते. आपल्याला अतिशय प्रिय असलेल्या व्यक्तीला ठार मारून त्याच्या मृतदेहाचा तुकडे करण्याचे बळ माणसात येते तरी कुठून असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

विकास गिरी व युनुस अन्सारी हे व्यावसायिक भागीदार होते. वर्षभरापूर्वी विकास काही कामासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो परतला नाही. तो बेपत्ता झाल्यानंतर चार महिन्यांनी दूधमतिया जंगलात मानवी मृतदेहाचे अवशेष आढळले होते. रिवा जिल्ह्यातील मौगंज पोलिसांनी अधिक शोध घेऊन जंगलात एकूण ८० हाडे हस्तगत केली.

हे मानवी अवशेष विकासचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी विकासचे मित्र, कुटुंबीय व नातेवाइकांशी चर्चा केली तसेच अन्य स्रोतांकडून माहिती मिळवत त्याच्या खुनाचे गूढ उकलले. पोलिसांनी युनुसला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे

कुटुंबीयांनाही अमान्य
– विकास व अन्सारी वन विभागाकडून वृक्षारोपणाचे ठेके घेत. यामुळे विकासचे युनुसच्या घरी येणे-जाणे होते.
– युनुसला तीन बहिणी आहेत. त्यांच्यापैकी एकीशी विकासचे कथितरीत्या प्रेमसंबंध होते. ही बाब समोर आल्यानंतर अन्सारी कुटुंबीय संतप्त झाले.
– आरोपीने मेहुण्यासोबत मिळून विकासचा खून केला. बहिणीचा विनयभंग केल्याबद्दल विकासचा आपण ३ ऑक्टोबर २०२१ च्या रात्री चाकूने भोसकून खून केला, अशी कबुली युनुसने दिली.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button