मुंबई

3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात


बाळासाहेबांची शिवसेना गटात इन्कमिंग सुरूच आहे. गजानन कीर्तिकर यांच्या सारखे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिंदे गटात सामील झाले आहे.त्यानंतर आता ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येतील असा दावाच खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक च्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात 100 टक्के येतील असा दावा केला आहे. गजानन कीर्तिकर यांच्यानंतर 3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे.



आम्ही लोकांमध्ये राहणारे आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहे. पण काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम आहे. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडे थांबलेले आहे.

जशा निवडणुकासमोर येतील शिवसेनेचे घर खाली झालेले असेल, असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे. (फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोल, पण उदयनराजे कोश्यारींवर आक्रमक, थेट अमित शाहंकडेच जाणार!) याअगोदर देखील खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट न्यूज 18 लोकमतकडे केला होता. त्या अनुषंगाने या खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

जळगावात शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश, गुलाबराव पाटलांना धक्का दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील धरणगावात शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (‘महाराज आमचं दैवत, त्यांची तुलना…’, राज्यपालांचा विषय मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात संपवला!) धरणगाव इथं जळगाव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केल. संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला. धरणगाव हा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यातच गुलाबराव पाटील यांना आज उद्धव ठाकरे गटाने मोठा धक्का दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button