क्राईम

मुलाने आईसह मिळून वडिलांची हत्या वडिलांच्या मृतदेहाचे 6 तुकडे..


कोलकाता : श्रद्धा वालकर हे संपूर्ण देशाला हादरवणारं हत्याकांड सध्या बरंच चर्चेत आहे. अशातच आता पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका मुलाने आईसह मिळून वडिलांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी त्याने वडिलांच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा मर्डर केसपासून प्रेरित होऊन आई आणि मुलाने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने बाथरुमच्या आत करवतीने वडिलांचा मृतदेह कापला, ज्यामध्ये आईनेही त्याला साथ दिली.



आई आणि मुलगा आधी मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी सायकलवर एकत्र गेले. मात्र, नंतर दोनवेळा मुलगा एकटाच मृतदेहाचे तुकडे सायकलवर टाकून फेकून देण्यासाठी गेला.

ही हृदयद्रावक घटना कोलकात्यातील बारुईपुर भागात घडली आहे.

आई-मुलाच्या जोडीने उज्ज्वल चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीची हत्या केली आणि नंतर दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने प्रेरित होऊन त्याचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. खरं तर खुनाच्या ३-४ तासांनंतरही आई-मुलाला मृतदेहाचं काय करावं हे समजत नव्हतं. तेव्हाच दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणासारखंच काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि मुलाने वडिलांचे ६ तुकडे केले. काही दिवसांपूर्वी घरात लाकडाचे काम करण्यात आले होते आणि या कारणास्तव घरात आधीपासून एक करवत होती, ज्याच्या मदतीने मृतदेह कापण्यात आला.

पोलिसांना घरात रक्ताचे डाग सापडू नयेत म्हणून मृतदेह बाथरूममध्ये कापण्याची आईची कल्पना होती. बाथरूममधून रक्त धुणे सोपे होईल, असं त्यांना वाटलं.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button