कोब्रा सापाने कोंबडीच्या पिल्लांवर केला हल्ला संतापलेल्या आईने काय केले सापाचे हाल पहाच!
मानव असो वा प्राणी आई ही आई असते. आपल्या मुलांवरील संकट आलं की ती कोणतीही पर्वा न करतो समोरच्याशी भिडते. एका व्हायरल व्हिडीओमध्ये अशीच आई दिसली आहे.
आपल्या पिल्लांचा बचाव करण्यासाठी सापासारख्या विषारी प्राण्यासमोर कोंबडी उभी राहिली. नुसती उभी राहिली नाही तर सापाला (Snake) आपल्या पिल्लांच्या जवळपासही फिरकू दिलं नाही.
ट्विटरवर @ViralPosts5 या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये कोब्रा साप आणि कोंबडी एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. कोब्रा सापाने कोंबडीच्या पिल्लांवर हल्ला केल्यानंतर संतापलेल्या आईने सापाला चांगलाचा धडा शिकवला.
सापाशी भिडताना कोंबडी कुठेही मागे हटताना दिसत नाही.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक कोंबडी कोब्रावर रागाने हल्ला करताना दिसत आहे. सापासारख्या चपळ प्राण्याला देखील कोंबडीने सळो की पळो केलं. अखेर कोणताही पर्यान उरल्याने जीव वाचवण्यासाठी सापाने तिथून पळ काढला.
ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला ते आईची मुलांप्रती असलेली माया आणि शक्ती पाहून चकित झाले आहेत. मुलांचा त्रास आईला अजिबात सहन होत नाही. मुलांच्या सुखासाठी ती काही करायला तयार असते हेच या व्हिडीओतून दिसत आहे.
व्हिडीओला 16 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर जवळपास 62 हजार यूजर्सनी व्हिडीओला लाईक केलं आहे. आईशी पंगा घ्यायचा नाही असं म्हणत अनेकांना व्हिडीयोवर कमेंट केल्या आहेत.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या