७ महिन्यापुर्वीच जळालेल्या मिटरचे महिन्याकाठी ५३२० रू विजबील;महावितरणचा खंडाळा येथील दलित-भिल्ल-कुंभार वस्तीला शाॅक – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


७ महिन्यापुर्वीच जळालेल्या मिटरचे महिन्याकाठी ५३२० रू विजबील;महावितरणचा खंडाळा येथील दलित-भिल्ल-कुंभार वस्तीला शाॅक:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
महावितरणकडून ऐन दिवाळीत थकीत विजबील भरण्यात यावे अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याच्या धमक्या मिळत असतानाच महावितरण कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अंदाजे रिडींग टाकुन विजवसुली करण्याच्या घटना ग्रामीण भागात नित्याच्याच असताना ७ महिन्यापुर्वीच जळालेल्या मीटरचे एका महिन्याचे तब्बल ५३२० रूपये बिल आल्यामुळे व महावितरणकडून भरावेच लागेल या तगाद्यामुळे वीजग्राहक आर्थिक संकटात सापडले आहेत.

सविस्तर माहीतीस्तव
__
बीड तालुक्यातील मौजे खंडाळा येथील हनुमान नगर अंतर्गत दलित-भिल्ल-कुंभार समाजाची एकुण २० च्या आसपास घरे असून सर्वजण भुमिहीन मोलमजुरी करून पोटभरणारांचीच घरे आहेत. मात्र महावितरणच्या अवाजवी विजबिलामुळे परेशान झाली आहेत. आप्पा बन्सी पवार यांच्या नावाने असलेले वीजमीटर क्रमांक ०७५१३६८९११५ हे ७ महिन्यापुर्वीच जळालेले असून दरमहा अंदाजेच ४०० च्या आसपास विजबील नियमित भरत होते परंतु या महिन्यात त्यांना एका महिन्याचे ५३२० रूपये विजबील आल्यामुळे चक्रावून गेले असुन संबधित महावितरण आधिका-यांना तक्रार केली असता विजबील भरावेच लागेल असे उत्तर मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. याचप्रकारे तुळशीराम बर्डे यांना ३ महिन्याचे १७००० रूपये तर पिंटु गोवर्धन पवार यांना महिन्याचे १८३० तर बन्सी नाना पवार यांना महिन्याचे १३१० रूपये विजबील आले आहे.

ग्रामीण भागात दिवाळीत सक्तीची विजवसूली आणि अंदाजे अवाजवी विजबील अन्यायकारक:- डाॅ.गणेश ढवळे
____
महावितरणकडून ग्रामीण भागात दिवाळीत थकीत ग्राहकांना वीजबिल भरा अन्यथा विज पुरवठा खंडित करण्यात येईल असा ईशारा दिला जातो मात्र बहुतांश ठीकाणी मिटर रिडींग अंदाजेच टाकण्यात येउन वापरापेक्षा आधिकची विजवसुली करण्यात येते अन्यथा विजपुरवठा खंडित करण्यात येत असून अन्यायकारक विजबील वसुली बंद करून वापरात येणा-या वीजबिलाचीच आकारणी करण्यात यावी.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !