क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

भांडणातून 24 वर्षीय तरुणीवर वार


जुन्या भांडणातून 24 वर्षीय तरुणीवर वार करण्यात आले आहेत.(Pimpri crime) ही घटना पिंपरीतील भाजी मंडईजवळ घडली.



तरुणीने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून लड्या उर्फ हर्ष अमर बहोत (वय 19 रा. पिंपरी) याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहण्यास आहेत. त्यांच्यात जुने भांडण झाले होते. त्यातून फिर्यादी यांनी आरोपीवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.(Pimpri crime) त्याचा राग मनात धरून आरोपीने शुक्रवारी फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादी यांच्या डोक्यात, कानावर, हातावर जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले.यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपीवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button