स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे गाडीच्या बोगीला आग

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे गाडीच्या बोगीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. हावडा मेल एक्स्प्रेसच्या बोगीला आग लागली.
स्टेशनवर गाडी थांबली असताना ही घटना घडली. तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वेला आज सकाळी आग लागली.

व्हिडिओ पहा👇👇

मुंबईकडे येणाऱ्या हावडा मेलच्या बोगीत आग लागली.

आज सकाळी शालिमार/हावडा एक्स्प्रेसला आग लागली. प्रवाशी गाडीला आग लागल्याने एकच धावपळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही.

गाडी नाशिकरोड रेल्वे स्थानकात पोहचताच आग लागली. गाडीच्या पार्सल डब्यात आग लागली असल्याचे समोर आले. 4 डबे पार्सल असल्याने मनुष्यहानी नाही. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे विस्कळीत झाली आहे.

प्लॅटफॉर्म 1 व 2 चालू राहणार आहे. हेड वायर तुटल्याने तुर्तास प्लॅटफॉर्म 3 वरील रेल्वे दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली आहे.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !