ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

बस स्टँडवर बसमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा जळून मृत्यू


रांचीमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. लोअर बाजार पोलीस ठाणे भागात खादगढा बस स्टँडवर बसमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा जळून मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या रात्री बसमध्ये हे दोघे दिवे लावून झोपले होते, असे सांगितले जात आहे.
रात्री अचानक बसला आग लागली. यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. बसला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत बस जळून खाक झाली होती. पोलिसांनी बसमध्ये सापडलेल्या अर्धावस्थेत जळालेले दोन मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत.



तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लोकशाही न्युजला फॉलो करा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button