४० वर्षांच्या राजकारणामध्ये ४ वर्षांची सत्ता मिळाली. मग माझ्या अंगामध्ये शिवरायांचे संस्कार, मुंडेंचे रक्त आहे. मी कुणाला घाबरत नाही

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ताई शहरातील लोक राजकारण करत नाही. तुमच्यावर आरोप आहे, तुम्ही गर्दी करतात, मग राजकारणामध्ये गर्दी करतो हा काय गुन्हा आहे. नाशिकला देवीच्या दर्शनाला गेले तर लोकांची एकच गर्दी झाली. जेपी नड्डांनी मला सांगितलं, तुमची गर्दी तुमची ताकद आहे. अमित शहा दोन वेळा आले आहे. त्यांनी सुद्धा हेच म्हटलं आहे. माझ्या लोकांची गर्दी हे माझे प्रेम आहे. पंडीत दिनदयाळ उपाध्य यांचा आदर्श ठेवून मी राजकारण करते. यांचाच विचार घेऊन मी वारसा चालवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार घेऊन मी वारसा चालवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार घेऊन मी वारसा चालवत आहे.

बीड : ‘मी कोणापुढे झुकणार नाही, संघर्ष सोडला नाही. असा एल्गार पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरून केला. महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील भगवान गडावर पंकजा मुंडे दसरा मेळाव्यातून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
मागच्या काही काळात पंकजा मुंडे यांच्यावर पक्षात स्थान नसल्याने ते काय बोलतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दसरा मेळाव्याला संबोधीत करताना पंकडा मुंडे म्हणाल्या कि, ओ पोलिस, तुमच्याशी बोलते, संपूर्ण सभा शांत आणि शिस्तीत आहे. समोर असलेले काही धिंगाणा करत आहे. तुम्ही आमचे असाल तर धिंगाणा करणार नाही. मुंडे साहेबांना काय संघर्ष नव्हता, प्रवाहाच्या विरोधात कमळाचे फुल घेऊन ते लढले. ४० वर्षांच्या राजकारणामध्ये ४ वर्षांची सत्ता मिळाली. मग माझ्या अंगामध्ये शिवरायांचे संस्कार, मुंडेंचे रक्त आहे. मी कुणाला घाबरत नाही. मी या वचनाला कधीही मुकणार नाही, मी कधीही थांबणार नाही. कधीही झुकणार नाही.

भाषणाच्या सुरूवातील पंकजा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी आवाज दणाणून गेला, त्या पुढे म्हणाल्या कि, पोलिसांनी शांततेनं घ्यावं, सगळे जण शांत बसले आहे. समोर बसलेले पाच जण आता शांत बसतील, ंिधगाणा करण्याची ही जागा नाही. आज दसरा मेळावा आहे, या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो मुंडे समर्थक आले आहे. नाशिक, शिर्डी, सिंदखेड राजा, औरंगाबाद सगळ्याच ठिकाणाहून आपण आला आहात. मी देवीकडे मागणी करते की, देवी जसं जन्माला घातलं स्वाभिमानीच्या पोटी, तसं स्वाभिमानाने मरणाला जाऊ दे.

मेळावा म्हटलं तर आरोप होते, चिखलफेक होते, मी मीडियावाल्यांना म्हटले हा चिखलफेक करणारा नाही तर चिखल तुडवणा-यांचा मेळावा आहे. त्यामुळे चिखल तुडवणे आणि संघर्ष करणे हे रक्तात आहे. जे मुंडेंचे विरोध होते, जे माझे विरोधक होते, त्यांनी माझ्यावर टीका केली, मी त्यांच्यावर कधी खालच्या पातळीवर टीका केली का, कधी संधीचा फायदा घेतला का, ते आमच्या रक्तात नाही. हकीकत को तलाश करणार पडता है, अफवा ये तो घर बैठे बैठे मिल जाती है, हीच हकीकत आहे असे त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे मुख्यमंत्री पाहिजे, अशी घोषणा समर्थकांनी केली, यावर पंकजा म्हणाल्या की, प्रीतमताईंनी सांगितलं की, संघर्ष करो या घोषणा बंद करा, कुणाला संघर्ष आयुष्यात आला नाही. कुणाचे जोडवे उचलणा-याचा इतिहास कधी झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या इतिहासात भगवान बाबा हा राष्ट्र संत होऊन गेला, त्यांच्यासमोर आपण सभा घेत आहोत. त्या भगवान बाबांचा भक्त गोपीनाथ मुंडे हा होऊन गेला. त्यांच्या पोटी मी जन्म घेतला. त्यामुळे संघर्ष विसरू शकत नाही. युद्धात, तहात वेदना होत असते. कार्यकर्ता, प्रधान मंडळाकडून शिवरायांना संघर्ष सुटला नाही.