मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलयेथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.
रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली असून मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसंच रिलायन्स एचएन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 12.57 वा. सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डी बी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल च्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता.
सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिलेली होती. सदर धमकीच्या अनुषंगाने डॉ डी बी मार्ग पोलिस ठाणेस गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून प्रस्तुत प्रकरणी अधिक चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.