व्हिडिओ न्युज

Video : PoK ताब्यात घ्यायला कोणी रोखले??, पण पाकिस्तान थेट भारतावर अणुबॉम्बच टाकेल ; फारूक अब्दुल्लांनी ओकली गरळ !!


लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा जवळ असताना काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांची भाषा आता थेट पाकिस्तानच्या तोंडची झाली आहे. पाकिस्तानी नेते जशी भारताचा द्वेष करणारी गरळ असतात, तशीच गरळ भारतातले इंडिया आघाडीतले नेते ओकू लागले आहेत. 

भारताच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी जिंकले पाहिजेत. नरेंद्र मोदी हरले पाहिजेत, असे ट्विट इम्रान खान सरकार मधला माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन याने केले. त्या पाठोपाठ हेमंत करकरेंना लागलेली गोळी दहशतवादी अजमल कसाबची किंवा बाकी कुठल्याही दहशतवाद्याची नव्हती, तर ती संघावर निष्ठा असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची होती, अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पाकिस्तानची तळी उचलली.

त्या पाठोपाठ जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी तर पाकिस्तान थेट भारतावर अणुबॉम्बच टाकेल, अशी धमकी भरली भाषा वापरली.

PoK अर्थात पाकिस्तान व्यक्त काश्मीर घेण्यासाठी भारताला कुठलीही लष्करी चाल करण्याची गरज नाही. पाकिस्तानी व्याप्त काश्मीर मधल्या जनतेची भावनाच भारताला अनुकूल आहे. योग्य वेळ येताच ते स्वतःहून भारतात विलीन होतील, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता फारूक अब्दुल्ला खवळले आणि त्यांनी पाकिस्तान थेट भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकीभरली भाषा वापरली.

PoK ताब्यात घेण्याबाबत स्वतः संरक्षण मंत्री बोलत असतील तर त्यांना कोणी रोखले आहे?? त्यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जरूर घुसावे, पण त्यांनी हे समजून असावे की, पाकिस्तान्यांनी पण हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्ब सारखी घातक शस्त्र आहेत. ते आमच्यावरच पहिला अणुबॉम्ब टाकतील, अशी धमकी फारूक अब्दुलांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button