नितीन गडकरी संतापले त्यांच्या भाषणाची मोडतोड केलेला व्हिडिओ व्हायरल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) संरचनेत सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या केंद्रीय संसदीय मंडळाची आणि केंद्रीय निवडणूक समितीची काही दिवसांपूर्वी पुनर्रचना करण्यात आली.
यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आलं.
यानंतर सोशल मीडियात नितीन गडकरी यांच्याशी संबंधीत एक व्हिडिओ अतिशय वेगानं व्हायरल होतोय. ज्यात मंत्रीपद गेलं तरी काही फरक पडत नाही, असं गडकरी म्हणताना दिसतायेत. भाजपसोडून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल केला.

यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापलेत. त्यांच्या भाषणाची मोडतोड केलेला हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. दिल्लीतल्या एक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींनी आपल्या भाषणात 1996 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मेळघाटसंदर्भातला एक प्रसंग सांगितला होता. यात त्यांनी मेळघाटात रस्ते नव्हते, कुपोषण होतं. त्यावेळी त्यांनी जे होईल ते होईल, मंत्रीपद गेलं तरी फरक पडत नाही असं वक्तव्य केलं होतं. संपूर्ण भाषणातल्या दोन वेगवेगळी वाक्य एकत्र करुन ही क्लिप तयार करण्यात आली आहे.

पण त्या व्हिडिओची मोडतोड करुन तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. काही लोकांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन चुकीची आणि बनावट मोहिम सुरु केल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.

नितीन गडकरी हे नेहमीच स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी वक्तव्याची मोडतोड करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा कडक इशारा गडकरींनी दिलाय.