क्राईमताज्या बातम्यानागपूरमहत्वाचेमहाराष्ट्र
पेपर चांगले न गेल्यामुळे विद्यार्थिनीची विष घेवून आत्महत्या

दिव्या नेवराम गिऱ्हारे या 19 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती नरखेड तालुक्यातील शेंबडा येथील रहिवासी होती. मृत दिव्या ही बीएसस्सीच्या प्रथम वर्षाला होती.
तिचे पेपर चांगले न गेल्यामुळे ती तणावात होती. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरी कुणीही नसताना तिने धान्यामध्ये टाकायचे विषारी पावडर खाल्ले. यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला आधी सावनेर येथील शासकीय रुग्णालय दाखल केले.
मात्र, तिची प्रकृती बिघडल्याने पुढे नागपूर मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी साडेनऊ वाजेच्या सुमारास 12 तारखेला घडली. याप्रकरणी नेवराम भैयालाल गिऱ्हारे (वय 48, रा.
शेंबडा, ता. नरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.