ताज्या बातम्यामनोरंजनमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

नेहा ची गुपचूप लग्नगाठ


मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा जोशी
नुकतेच नेहाने गुपचूप लग्नगाठ बांधल्याचे समोर आले आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तिने लग्न कोणासोबत केले हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर तिने अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक ओमकार कुलकर्णीसोबत लग्न केले आहे.

मुंबईत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. नेहा आणि ओमकारअनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. आपल्‍या विवाह समारंभाबाबत सांगताना नेहा जोशी म्‍हणाली, ”अगदी थोडक्‍यात हा विवाह समारंभ पार पडला, जेथे या विवाह समारंभासाठी आमच्‍यासोबत जवळचे नातेवाईक व मित्र उपस्थित होते. माझी मोठ्या जल्‍लोषात विवाह करण्‍याची कधीच इच्‍छा नव्‍हती आणि मी नेहमीच गोष्‍टी साध्‍यासोप्‍या ठेवण्‍याला पसंती दिली आहे.

पती – अभिनेता, दिग्‍दर्शक व लेखक ओमकार कुलकर्णीबाबत सांगताना नेहा म्‍हणाली, ”मला आठवते की, दहा वर्षांपूर्वी एका मराठी मालिकेच्‍या सेटवर मी त्‍याला भेटले. अनेक वर्षे एकमेकांना जाणून घेतल्यनंतर आमच्‍यामध्‍ये प्रेम बहरले. आम्‍हा दोघांना आमच्‍या कलेप्रती समान प्रेम व आवड आहे आणि माझ्या मते याच गोष्‍टीने आम्‍हाला जवळ आणले. आम्‍ही लिव्हिंग-इन रिलेशनशीपमध्‍ये राहिलो. आम्‍हाला विवाह करावा असे कधीच वाटले नाही, कारण आमच्‍यामधील एकमेकांप्रती प्रेम, आदर व आपुलकी आमच्‍या नात्‍यापेक्षा अधिक होते. याव्‍यतिरिक्‍त आम्‍ही पूर्णत: आमच्‍या करिअरवर लक्ष केंद्रित केले, ज्‍यामुळे आम्‍ही व्‍यस्‍त राहिलो.
काळासह आमचे नाते अधिक आपुलकीचे व प्रबळ झाले आहे.. लग्नाची तयारीसोबत मी एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘दूसरी माँ’मध्‍ये काम करण्‍याला होकार दिला, ज्‍याचं शूटिंग सुरू झालं आहे. शूटिंग आणि विवाहाची तयारी या दोन्‍ही गोष्‍टी मॅनेज करताना अनेक आव्‍हान आली. मी माझ्या विवाहाच्‍या आदल्‍या दिवशी मालिकेसाठी पहिला प्रोमो शूट केला.हे सगळं करताना ओमकारचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. त्‍याच्‍या पाठिंब्‍याशिवाय या सर्व गोष्‍टी शक्‍य झाल्‍या नसत्‍या. माझ्या जोडीदारासोबत माझ्या जीवनातील नवीन अध्‍याय सुरू करण्‍याची ही अद्भुत भावना आहे.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button