ताज्या बातम्यामराठा आरक्षणमहत्वाचेमहाराष्ट्र

सरकारच्या शिष्ट मंडळाशी जरांगेची चर्चा,उपचार घेण्यास सुरुवात


जालना : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून अन्न,पाणी, व औषध उपचार न घेता आमरण उपोषण सुरू केले आहे. या दरम्यान काल त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याने मराठा बांधव आक्रमक झाले आहेत.



पाणी प्या या मागणीसाठी महिला, पुरुष आक्रोश करत आहेत.

आज सरकार कडून काही कागदपत्रे घेऊन अंबडचे उप विभागीय अधिकारी, तहसीलदार जरांगेंकडे आले होते. पण त्यांनी आणलेल्या कागदपत्राची पाहणी केल्यावर जरांगे यांनी केलेल्या मागण्या त्यात पूर्ण होत नसल्याने मी केलेल्या मागण्या पूर्ण करून या तरच चर्चा करू असे सांगितल्याने हे शिष्ट मंडळ परत गेले आहे.

दरम्यान जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागल्याने महिला पुरुष आक्रमक झाले आहेत, आक्रोश करू लागल्याने लोक आग्रहाखातर त्यानी पाणी पिऊन सलाईन घेण्यासाठी तयारी दाखवली आहे. खासगी व सरकारी डॉक्टरांच्या मदतीने त्यांना अखेर सलाईन देण्यात यश आले आहे.

मनोज जरांगे यांनी सरकार कडे केलेल्या 6 प्रमुख मागण्या

सगेसोयरे शब्दाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी
या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा कायदा पारित करणे.
नोंदी सापडलेल्या 57 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे.
राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे
हैदराबादचे गॅझेट स्वीकारावे
शिंदे समितीला वर्षभराची मुदत देण्यात यावी
या मागण्या पूर्ण झाल्या तर मी उपोषण सोडण्यास तयार असून चर्चा करण्याची तयारी जरांगे यांनी दाखवली आहे.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर

शुक्रे समितीने आज मराठा सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर केला. अगदी कमी वेळात आणि दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे अभिनंद केले आणि आभार मानले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button