क्राईमपुणे

10 वर्षीय मुलगी क्लासवरुन घरी जात होती, रस्त्यात पोलिसांने अडवलं अन् नंतर थेट..


पुणे : पुणे जिल्ह्यातील नारायण गाव परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लहान मुलीसाठी पोलीस संरक्षक नाही तर भक्षक ठरला आहे. शाळेतून घरी येत असताना एका 10 वर्षाच्य़ा मुलीबरोबर पोलिसांनेच अश्लील चाळे केले आहे.



या प्रकारामुळे नेमका विश्वास कोणावर ठेवावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करुन पोलिसांला अटक करण्यात आली आहे.

एका 38 वर्षीय पोलिसानेच 10 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले आहे. नारायण भाऊसाहेब बर्डे, असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा पोलीस कर्मचारी सध्या पोलीस नाईक म्हणून जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याच्याविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडीत मुलगी ही चौथ्या वर्गात शिकते. ती खासगी क्लासवरुन दुपारी 1 वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी बर्डे याने मुलीला शंभर रुपये देतो, असं सांगत मोटरसायकलवर बस असा आग्रह केला. त्यावर या मुलीने बर्डेला नकार दिला. त्यानंतर बर्डेने तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं. हा सगळा प्रकार पाहून मुलगी घाबरली आणि रडत घरी गेली. ही सगळी घटना तिने तिच्या आजीला सांगितली. त्यावेळी पालक संतापले आणि त्यांनी मुलीच्या क्लासच्या रस्त्याचा शोध घेतला. त्यावेळी पोलीस दिसून आला. स्थानिकांनी बर्डे याला पकडून पोलिसांत स्वाधीन केलं. आरोपीने केलेल्या कृत्याचे सीटीव्ही फुटेज नागरिकांनी पोलीस स्टेशनला दिले आहेत. बर्डे हे चार वर्षांपासून ओतुर पोलीस स्टेशनमध्ये सेवेत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button