अजित पवारांबरोबरची बैठक “गुप्त” नव्हती असे सांगून पवारांची बैठकीतले तपशील सांगायला मात्र टाळाटाळ!!
सांगोला : पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी झालेली अजित पवारांबरोबरची बैठक “गुप्त” नव्हती, असा दावा शरद पवारांनी केला. पण बैठकीतले तपशील सांगायला मात्र त्यांनी टाळटाळ केली.
ajit pawar meet with sharad pawar in pune
सांगोल्याचे माजी आमदार शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवारांबरोबर सहभागी झाले होते.
अजित पवारांबरोबर काल अतुल चोरडिया यांच्या घरी झालेल्या बैठकी संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर पवारांनी ती बैठक “गुप्त” नसल्याचा दावा केला अजित पवार हे माझे पुतणे आहेत आणि घरातल्या वडीलधाऱ्यांना कोणी भेटायला आले तर त्यात वावगे काय??, असा सवाल त्यांनी केला.
शरद पवार मोठा झटका; नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह, पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांना पाठिंबा!
राष्ट्रवादीतल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे हे मान्य. पण त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचे मान्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप बरोबर जाणार नाही. उलट 31 ऑगस्टला “इंडिया” आघाडीतल्या सर्व पक्षांची बैठक मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी मुंबईत बोलवली आहे. त्याला 30 – 40 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पवारांनी दिली.
अजित पवारांबरोबर झालेली बैठक “गुप्त” नसल्याचे त्यांनी सांगितले, तरी त्या बैठकीत झालेल्या चर्चेचे तपशील मात्र सांगायला त्यांनी टाळाटाळ केली. उलट त्या चर्चेने जर पत्रकारांचा संभ्रम झाला असेल, तर तुम्हालाच उद्योग नाही, अशा शब्दात पवारांनी पत्रकारांचीच खिल्ली उडवली. पण गुप्त नसलेल्या बैठकीतले तपशील सांगायला मात्र त्यांनी टाळाटाळ केली.
महत्वाच्या बातम्या
जम्मू-काश्मिरात तिरंगा रॅलीचा उत्साह, पुलवामाच्या मेरी माटी मेरा देश यात्रेत हजारो लोकांची गर्दी
जेनेरिक औषधी न लिहिल्यास डॉक्टरांचे परवाना होणार निलंबित, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची नवीन नियमावली
श्रीराम ग्रुपच्या संस्थापकांनी दान केले तब्बल ₹ 6 हजार कोटी; क्रेडिट स्कोर न पाहता लोन देतो ग्रुप
चोरडियांच्या बंगल्यात अजितदादांची “गुप्त” भेट घेतल्यानंतर पवारांची संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात मोदींवर शरसंधान!!