क्राईम

मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक करून 5 गुन्हे उघडकिस आणुन 5 मोटार सायकल जप्त


मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक करून 5 गुन्हे उघडकिस आणुन 5 मोटार सायकल जप्तसासवड : सासवड पोलीस स्टेशन हद्दीत दि.29/07/2023 रोजी पोलीस हवालदार संतोश शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, वाहतुक वार्डन ऋतुराज देसाई, विक्रम जगताप असे सासवड शहरात जेजुरी नाका येथे वाहतुक नियमन तसेच वाहतुक कारवाई करीत असतांना दुपारी 3ः00 वा. च्या सुमारास एक इसम संशयास्पद स्थितीत मोटार सायकल घेवुन जातांना दिसुन आलेने त्यास थांबवले व त्याचेकडे गाडीचे कागदपत्र वाहन चालवण्याचा परवाना मागितला असता त्याने उडवा उडवी ची उत्तरे दिली व तो त्याचे ताब्यातील होंडा शाईन गाडी सोडुन नारायणपुर बाजुकडे पळुन गेला. त्यावेळी वरील पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडुन ताब्यात घेतले. अटक आरोपीस विष्वासात घेवुन त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या होंडा शाईन मोटार सायकल नं. MH.42.AB.0327 बाबत विचारपुस केली असता त्याने सदरची मोटार सायकल मी बारामती रूई एम.आय.डी.सी परीसरातुन चोरलेली असल्याची कबुली दिली आहे. तसेच तो चाकण येथुन बारामती येथे घरी महिन्यातुन, दोन महिन्यातुन जात येत होता. पण गावी जाण्या येण्यासाठी गाडी पाहिजे होती. घरचे लोक गाडी घेवुन देत नव्हते. म्हणुन तो गाडया चोरून काही दिवस वापरून सोडुन देत असत. त्याने सासवड परीसरातुनही 4 मोटार सायकल चोरलेल्या असलेबाबत सांगितले आहे.

आरोपीचे नाव – अल्ताफ ईकरार स्ययद, वय 20 वर्षे, रा. अजय मिश्रा यांचे खोलीत भाडयाने, निवृत्ती कार डेकोर/वाशिंग सेंटर जवळ, रूई एम.आय.डी.सी, बारामती, ता. बारामती, जि. पुणे. मुळ रा.सेक्टर.22, पुरानी सिमापुरी, नोयडा, दिल्ली, उत्तर प्रदेश.

वरील आरोपी कडुन खालील 5 गुन्हे उघडकिस आणुन गुन्हयातील मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

1)सासवड पो.स्टे.गु.र.नं.230/2023 भा.दं.वि.का.क. 379 गुन्हयातील होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.50.F.3931 किं.रू.50,000/-

2)सासवड पो.स्टे.गु.र.नं.348/2023 भा.दं.वि.का.379 मधील होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.12.QU.8092 किं.रू.45,000/-

3)सासवड पो.स्टे.गु.र.नं.378/2023 भा.दं.वि.का.379 मधील होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.12.GW.2488 किं.रू.45,000/-

4)सासवड पो.स्टे.गु.र.नं.406/2023 भा.दं.वि.का.379 मधील होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं. MH.12.JY.5568 किं.रू.15,000/-

5)बारामती तालुका पो.स्टे.गु.र.नं.413/2023 भा.दं.वि.का.379 मधील होंडा शाईन मोटार सायकल नं.MH.42.AB.0327 किं.रू.30,000/-

असा एकुण 5 मोटार सायकल एकुण किं.रू.1,85,000/- चा मुददेमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सो, आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, भोर विभाग तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन संतोश जाधव, पोलीस अंमलदार संतोश शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, जब्बार स्ययद, विशाल नगरे, शरद जाधवर, होमगार्ड विक्रम जगताप, ट्राफिक वार्डन श्रीकांत भंडलकर, चक्रधर गोपाळघरे, ऋतुराज देसाई, सचिन पवार, अक्षय लोंढे यांचे पथकाने केलेली आहे.
पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button