ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

शिर्डीत केंद्राची सुरक्षा नकोच; ग्रामस्थ आक्रमक फडणवीसांकडे केली मोठी मागणी.


शिर्डी साई मंदिर व परिसरासाठी सध्याची सुरक्षाव्यवस्था कायम ठेवावी. गरज भासल्यास पोलिस प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षित पोलिस जवानांची तुकडी तैनात करावी. मात्र सीआयएसएफची सुरक्षाव्यवस्था येथे तैनात करू नये, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. निवेदन दिल्यानंतर या मागणीस सहमती दर्शवित त्यांनी राज्य सरकार आपली भूमिका योग्य ठिकाणी मांडेल, असे आश्‍वासन फडणवीस यांनी दिल्याची माहिती पिपाडा यांनी दिली. पिपाडा यांनी निवेदनात म्हटले आहे की, साई मंदिर सदैव येथे भाविकांच्या भावना समजून घेऊन कार्यरत असलेली सुरक्षाव्यवस्था तैनात असायला हवी. सीआयएसएफ सुरक्षा व्यवस्था तैनात केल्यास भाविकांना आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना देखील त्याचा जाच सहन करावा लागेल. त्यातून आणखी नवे प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे. शिर्डी ग्रामस्थांची देखील अशीच मागणी आहे.देश-विदेशातील भाविक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन येथे सीआयएसएफ सुरक्षा व्यवस्था तैनात करू नये. राज्य सरकारने आमची ही बाजू न्यायालयात देखील मांडावी. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी सीआयएसएफ सारखी सुरक्षा पुरवली, तर रोजच भक्तांमध्ये व सुरक्षारक्षकांमध्ये वाद-विवाद होतील. यातून भक्तांच्या भावना दुखावल्या जातील.भाविकांनी गजबजलेले असते. साई संस्थान प्रशासनाने साई मंदिराच्या बाहेरील परिसरात भाविकांना चप्पल घालून प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चुकीचा निर्णय असून कडाक्याच्या उन्हामुळे भक्तांचे तसेच सफाई कामगारांचे पाय भाजून हाल होतात. संस्थानने अनावश्यक निर्णय घेऊन व्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न करू नये, याकडेही आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button