ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

नीता अंबानी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा खर्च ३० मिलियन अनेरिकन डॉलर म्हणजे, जवळपास २२० कोटी रुपये


मुंबई : अंबानी कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबाची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. कोणताही कार्यक्रम असला, तर अंबानी कुटुंब एकत्र येवून त्या कार्यक्रमाचा आनंद लूटतात. लग्न कार्यक्रमापासून ते वाढदिवसापर्यंत अंबानी कुटुंबातील अनेक कार्यक्रम मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरे होतात. २०१३ साली नीता अंबानी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या रॉयल पद्धतीत नीता यांचा वाढदिवस साजरा झाला.१ नोव्हेंबर २०१३ मध्ये राजस्थान येथील उम्मेद भवन येथे नीता अंबानी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल २५० पाहुणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उम्मेद भवन याठिकाणी पोहोचले. या सर्व पाहुण्यांना रिलायन्स ग्रुपच्या 32 चार्टर्ड विमानांद्वारे भव्य रिसॉर्टमध्ये आणण्यात आलं, ज्यांच्या फक्त वाहतुकीचा खर्च कोट्यवधी रुपयांमध्ये होता.

नीता अंबानी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा खर्च ३० मिलियन अनेरिकन डॉलर म्हणजे, जवळपास २२० कोटी रुपये इतका झाला होता. यामध्ये सर्वात जास्त खर्च डेस्टिनेशन, वाहतुकीवर झाला होता. नीता अंबानींच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीची सुरुवात 1 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या पूजेने झाली. यासोबतच धीरूभाई अंबानींचा चेहरा आकाशात साकारण्यासाठी लाइट शोचं देखील आयोजन करण्यात आलं होतं.

धीरूभाई अंबानी लाइट इफेक्टसाठी सिंगापूर येथून खास टीम बोलावण्यात आली होती. शिवाय कार्यक्रमात थायलंड येथून फुलं मागवण्यात आली होती. या पार्टीमध्ये मुलांसाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली होती. मुलांना खेळण्यासाठी लंडन येथून राइड्स मागवण्यात आल्या होत्या.

नीता अंबानी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्तल, महिंद्रा, बिर्ला, गोदरेज, शाहरुख खान, आमिर खान, करिश्मा कपूर आणि रानी मुखर्जी यांसारख्या अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यांच्याशिवाय, मुंबई इंडियन्स आयपीएल टीमला देखील नीता अंबानी यांनी निमंत्रित केलं होतं. या पार्टीमध्ये प्रियंका चोप्रा (Priyanka Chora) आणि एआर रहमान (AR Rehman) यांनी देखील सादरीकरण केलं होतं.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button