क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

पुरंदरमध्ये लाचखोर महिला तलाठ्यासह दोघांना रंगेहाथ पकडले..


तलाठी नीलम मानसिंग देशमुख यांच्यासह नारायण शेंडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.



पुणे : मृत आईचे सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या पुरंदर तालुक्यातील चांबळी गावच्या महिला तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या प्रकरणी महिला तलाठ्यासह दोघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तलाठी नीलम मानसिंग देशमुख यांच्यासह नारायण शेंडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने मृत आईचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यासाठी चांबळी गावच्या तलाठी नीलम देशमुख यांच्याकडे अर्ज केला होता. सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी तलाठी देशमुख यांनी शेंडकर याच्यामार्फत तक्रारदाराकडे दोन हजारांची लाच मागितली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावून शेंडकर याला तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेताना पकडले. चौकशीत तलाठी नीलम देशमुख यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे शेंडकर याने सांगितले. त्यानंतर दोघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ज्योती पाटील तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button