ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

कोरोना सोबतच H3N2 विषाणूच्या धुमाकूळ,पिंपरी-चिंचवडमध्ये एच3एन2 मुळे वृद्धेचा मृत्यू


पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 ने आणखी एका रुग्णाचा बळी घेतला आहे. 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेला H3N2 विषाणूची लागण झाली होती. (H3N2) पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूमुळे H3N2 विषाणूच्या मृतांची संख्या दोनवर गेली आहे. शहरात आत्तापर्यंत H3N2 च्या 17 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 15 रुग्णांनी यावर मात केली आहे. तर दुसरीकडे करोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.पुणे : (आशोक कुंभार ) पिंपरी-चिंचवड शहरात एक जानेवारीपासून ‘एच 3 एन 2’ बाधित 17 रुग्ण आढळले. त्यापैकी 15 रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी 80 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. 16 मार्च रोजी भोसरीतील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत एकही रुग्ण शहरात नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

शहरात सध्या कोरोना आणि सोबतच H3N2 विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात कोरोनाचे राज्यात सगळ्यात जास्त रुग्ण पुणे, मुंबई आणि ठाण्यात आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. सोबतच H3N2 विषाणूचेही रुग्ण राज्यात वाढत आहे. त्यात आता पिंपरी-चिंचवडमध्ये वृद्ध महिलेला बळी गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात 16 मार्चला H3N2 विषाणूचा पहिला बळी गेला होता. 73 वर्षीय रुग्णाला H3N2 विषाणूी लागण झाली होती. 8 मार्चला पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हा त्यांना H3N2 ची लक्षणे आढळली होती. म्हणून त्याच दिवशी त्यांचे नमुने पाठविण्यात आले. (H3N2) 10 मार्चला त्यांना H3N2 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. हृदयाशी निगडित त्यांना अधिकचा त्रास होत असल्यानं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button