ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

Video : चित्ता आणि हायनाला पाहाताच हरणाची एक्टिंग सुरु


वाघ, सिंह, चित्ता आणि बिबट्या हे सगळेच थरारक शिकारी आहेत. त्यांनी जर का एखाद्याची शिकार करण्याचा विचार केला की तो प्राणी संपलाच म्हणून समजा. जंगलातील हा नियम आहे की प्राणी पोटभरण्यासाठी एकमेकांची शिकार करत असतात.
असं असलं तरी देखील वाघ, सिंह, चित्ता तसेच बिबट्या असे प्राणी आहेत की त्यांचे काही काही स्वत:चे नियम आहेत. ते कधीही थंड मांस खात नाही. म्हणजेच त्यांना ताजं शिकार करुन खायला आवडतं. ज्यामुळे ते स्वत: शिकार करुन भक्ष खातात.https://twitter.com/TheFigen_/status/1640448002773884932?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1640448002773884932%7Ctwgr%5Ed3a82b94700f2753b816a4aa057b7c94be026c5b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

 

ते आधीच मेलेल्या प्राण्यांना कधीच खात नाहीत आणि याच गोष्टीचा फायदा एका हरणाने घेतला. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

व्हिडीओत हरणाने आपली हुशारी सिद्ध केली आहे शिवाय त्याने ऑस्कर विनिंग एक्टिंग केली आहे, असं म्हणायला देखील काही हरकत नाही हरणाला हे माहित होतं ही खूप वेळापूर्वी झालेल्या शिकाराला चित्ता कधीच तोंड लावत नाही, अशावेळी चित्ता समोर दिसताच हरणाने मरण्याची एक्टिंग केली. तरीही चित्ता हरणाच्या जवळ गेला. तेव्हा तेथे एक हायना देखील आहे. ज्याला पाहून चित्ता हरणापासून थोडा लांब झाला.

त्यानंतर हायना या हरणाला खाणारच होता. पण तितक्यात हायनाचं लक्ष भटकलं, ज्याचा फायदा घेत मेलेला हरीण जागा झाला आणि तेथून त्याने पळ काढली, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले.

व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तर हरणाच्या एक्टिंगचं कौतुक केलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button