Video:प्रेमात मिळाला मोठा धोका; मग तरुणीने भर चौकात काय केल?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


प्रेमात धोका मिळाल्यावर होणारं दु:ख शब्दात व्यक्त करता येत नाही. आजवर तुम्हीही कधीना कधी प्रेमात पडले असाल आणि एकदातरी तुमचं ब्रेकअप (Breakup) झालं असेल. मात्र तुम्ही हे दु:ख रस्त्यावर ओरडून सांगितलं आहे का? सध्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये ब्रेकअप झाल्याने ती बेभान झालेली दिसत आहे.

 

समोर आलेला व्हिडिओ हा मध्यप्रदेशमधील ग्वालेहर या शहरातील असल्याचे समजले आहे. सुशील कौशिक यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही २५ वर्षीय तरुणी पूर्णत: अवाक्याबाहेर गेली आहे. ती रस्त्यावर भर चौकात ड्राम करत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करत ती चक्क चालत्या कारच्या बोनेटवर बसते. त्यानंतर एका दुचाकी चालकाला थांबवून त्याच्याकडून दूचाकी घेते आणि त्याला निघून जाण्यास सांगते.

तसेत रस्त्यावर नुसता गोंधळ घालते. तिचं हे असं वागणं तिथे असलेल्या काही व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये कैद केलं आहे. तरुणी भरचौकात इतकी बेभान झाली की, तिला थांबवण्यासाठी थेट पोलिसांना बोलवावे लागले.

सुशील यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की, ” मुलीचा हाय व्होल्टेज ड्रामा. फुलबाग चौकात एका मुलीने गोंधळ घातला. हा सर्व गोंधळ सुरु असताना तरुणीला तिच्या प्रियकराने फसवलं आहे. असं ती सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणीला नेल्यानंतर या प्रकरणी अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतो आहे.