क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंगरात दगडाने ठेचून महिलेचा खून


कराड: (आशोक कुंभार ) डोंगरात जळण आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना वनवासमाची, ता. कऱ्हाड येथे मंगळवारी मध्यरात्री उघडकीस आली.
दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून खुनानंतर हल्लेखोर पसार झाला आहे.लता मधूकर चव्हाण (वय 45) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक राहूल वरोटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून संशयिताचा शोध सुरू केला आहे.पोलिसांकडून मिळालेलया माहितीनुसार, कराड तालुक्यातील वनवासमाची येथील लता चव्हाण या मंगळवारी दुपारी जळण आणायला गावाशेजारी डोंगरात गेल्या होत्या. त्यांची मुले शेणोली येथे अकलाईदेवी मंदीरात गेली होती. मुले घरी परत आल्यावर त्यांनी आईचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. दरम्यान, गावातील काही लोकांनी लता यांना जळण आणायला जाताना पाहिले होते.त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता रात्री उशिरा लता यांचा निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात लता यांचा गळा आवळून व दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. अत्यंत निर्घृण पद्धतीने लता यांचा खून केला असून संशयिताच्या शोधासाठी पोलिसांनी छपासत्र सुरू केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button