शेतमालाला योग्य हमीभाव नाही, दोन महिन्यात तब्बल 135 शेतकऱ्यांची आत्महत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : (आशोक कुंभार ) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अवकाळीसह शेतमालाला हमीभावाच्या मुद्द्यावरून अधिवेशन तापण्याची शक्यता आहे. याच दरम्यान आता सरकारला पुन्हा एकदा घेरण्यासाठी विरोधकांना आणखीन एक मुद्दा हाताशी लागला आहे. मराठवाड्या गेल्या दोन महिन्यात तब्बल 135 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

https://youtube.com/@lokshahinews6098

कापूस, कांदा आणि उसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्आ आर्थिक संकटात सापडला आहे. यातून शेतकरी हा आत्महत्याचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर येत आहे. आता याच मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.