ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भयानक अपघातात बैलांचा मृत्यू


जळगाव : (आशोक कुंभार ) जळगाव ते कानळदा रोडवर असलेल्या एका शेतकर्‍याच्या उभ्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणार्‍या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने 2 बैलांचा जागी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.03) घडली आहे.
दरम्यान या दोन बैलांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. ट्रॅक्टर चालकाने थेट दोन बैलांना धडक दिल्याने बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे. मालकाने जिवापाड जपलेल्या बैलांचा असा अचानक मृत्यू झाल्याने मालकाने हंबरडा फोडला होता.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते कानळदा रोडवर असलेल्या एका शेतकर्‍याच्या उभ्या बैलगाडीला भरधाव वेगाने ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत 2 बैलांचा जागी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.03) घडली आहे.

जळगाव, कानळदा रोडच्या बाजूला असलेल्या लक्ष्मी जिनिंगजवळ दगडू राजाराम यांचे शेत आहे. दगडू धनगर हे मुलगा रावसाहेब धनगर यांच्यासोबत शेतातील पिकांना खत देण्यासाठी बैलगाडीने रासायनिक खते घेऊन शेतात गेले.

त्यावेळी त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या रोडवर बैलगाडी उभी करून रासायनिक खते शेतात डोक्यावरून नेत होते. दरम्यान रोडवर उभी असलेली बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीत जाणार्‍या भरधाव वाळूच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला तर बैलगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रॅक्टर देखील पलटी होऊन बाजूला पडले.

हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. सुदैवाने या ट्रॅक्टरजवळ शेतकरी दगडू धनगर व रावसाहेब धनगर नव्हते, अन्यथा त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता होती. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर रस्त्यावर असलेल्या वाहतुकीचा देखील बराच वेळ खोळंबा झाला होता.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button