चोरट्यांनी चक्क वनविभागाच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मालेगांव:शहरातील मध्यवस्तीत असलेल्या वनविभागाच्या कार्यालयातील आवारात असलेले चंदनाचे झाडच चोरट्यांनी कापून चोरुन नेल्याची घटना घडली आहे याअगोदरही जिल्ह्यातील अनेक सरकारी अधिका-यांच्या बंगल्यातील आवारातून चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे. पण, चोरट्यांनी आता थेट वनविभागाच्या आवारातून झाड तोडून चंदनाचे लाकूड पळवून नेले. या चोरीची जोरदार चर्चा मालेगावमध्ये सुरु आहे. याप्रकरणी छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.