क्राईमताज्या बातम्या

प्रेमिकेला मेसेज करतो म्हणून मित्राचे हृदय कापून काढले!


हैदराबाद, : दोन मित्रांमध्ये कुणी स्त्री आल्यास प्रेमाच्या या त्रिकोणात कुण्या एका मित्राने त्याग करावा, अशी कथानके आपण रुपेरी पडद्यावर बघत आलो आहोत.
प्रत्यक्ष जीवनाच्या पडद्यावर हैदराबादेत प्रेमाच्या अशाच एका त्रिकोणातून मित्राने मित्राची हत्या केली. हत्या करून तो थांबला नाही; तर मृतदेहातून हृदय कापून बाहेर काढले. बोटे कापली. गुप्तांगही कापून काढले आणि या सगळ्याचे फोटो मोबाईल कॅमेर्‍याने काढून प्रेयसीला जणू गिफ्ट म्हणून सेंड केले…पी. हरिहर कृष्णा (वय 21) आणि नवीन (22) दोघे दिलसुखनगरातील एका कॉलेजात शिकत. ज्या मुलीवरून हे हत्याकांड घडले. तीही तेव्हा त्याच कॉलेजात शिकत असे. दोघा मित्रांचा तिच्यावर एकाचवेळी जीव जडला; पण नवीनने आधी प्रपोज केले. नवीन आणि तिची रिलेशनशिप पुढे काही महिन्यांनी तुटल्यानंतर मग हरिहरशी तिचे सूत जुळले… नवीनला याबद्दल कल्पनाही होती. नात्यांतील या स्थित्यंतरानंतरही हरिहर आणि नवीनची मैत्री कायम होती; पण नवीन तिला पुन्हा गळ घालू लागला. फोन करू लागला. मेसेज करू लागला. तीन महिने हे चालले. एक दिवस हरिहरला तिने हे सांगून टाकले. हरिहरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हरिहर आणि नवीन दोघे दारू प्यायला बसले. हरिहर त्याला ठरवून निर्जनस्थळी घेऊन गेला होता. पिणे सुरू होताच वादही सुरू झाला. घोटागणीक वाद वाढत गेला.

दारूच्या अंमलात हरिहरच्या मस्तकातील आग इतकी भडकली की, त्याने नवीनचा गळाच आवळला. श्वास थांबत नाही तोवर आवळत राहिला. नवीन मरण पावल्यानंतरही हरिहरच्या सुडाची आग शमली नाही. त्याने नवीनची छाती कापून त्यातून हृदय बाहेर काढले. गळा कापला. एकेक करून बोटे कापली. गुप्तांगही कापून वेगळे केले. मृत नवीनची आणि त्याच्या सर्व अवयवांची मोबाईल कॅमेर्‍याने छायाचित्रे काढून प्रेयसीला व्हॉटस्अ‍ॅपवर सेंड केली. नंतर पोलिसांसमोर सरेंडर केले. नवीन हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली होती. हरिहर पोलिसांना शरण आल्यानंतरच हे सारे उघडकीला आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button