पाटणा : समलैंगिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पाटण्याजवळील दानापूरमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
पवनराम व निशू हे पती-पत्नी होते. हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यातील मृताचा मोबाइल आरोपी राणीकडे आढळला. तिथेच पोलिसांना संशय आला आणि त्यांनी राणीची चौकशी सुरू केली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, राणी व निशू यांची भेट एक वर्षापूर्वी एका रुग्णालयात झाली होती. त्यानंतर, दोघी बोलत होत्या, भेटत होत्या. राणी आणि निशू एकत्र राहू इच्छित होत्या. त्यामुळे राणीचे निशूच्या घरी येणे-जाणे वाढले. याच घटनाक्रमात पवन व राणीची ओळख झाली. त्यानंतर, या दोघांमध्येही संबंध निर्माण झाले.
समजावले पण…
राणीने दोघांशीही संबंध प्रस्थापित केले. मात्र, हा प्रकार पवनला आवडला नाही. त्याने पत्नीला वारंवार समजावून सांगितले. संबंध तोडण्याचा सल्लाही दिला. यावरून पती-पत्नीमध्ये भांडणे होऊ लागली. या प्रकारानंतर निशू व राणी दोघींनीही पवनचा काटा काढण्याचा कट रचला.