Video : पाकिस्तानात लाईट गुल! खांबावर चढून पोरं तारेवर खेळतायेत झोका

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पाकिस्तानवर आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे. लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी वणवण करावी लागत आहे. तर लोकांच्या गर्दीमुळे केंद्र सरकारकडून पुरवण्यात येणारे धान्य लष्कराच्या उपस्थितीत वाटावे लागत आहे.

पाकिस्तानच्या बहुतांश भागात लाईटही गुल झाली असून तेथील लाईटच्या तारेवर मुलं खेळताना दिसत आहेत

 

पाकिस्तानच्या भीषण परिस्थितीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाईट नसल्यामुळे तेथील अनेक लहान मुले लाईटच्या खांबावर चढून तारेवर झोका खेळत आहे. हा प्रकार खूप गंभीर असून अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये डाळी, तेल, धान्य, पीठ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्याचबरोबर पेट्रोलची किंमतही वाढली असून नागरिकांना दोन वेळच्या अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक देशांनी पाकिस्तानला मदतीचा हात दिला असून याचा मोठा फटका पाकिस्तानला बसत आहे.