क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

माफी मागताना पाया पडण्याचे नाटक अन जावयाने सासूवर चाकूने केला हल्ला..


पुण्यात (Pune News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय.



अशातच कौटुंबिक हिंसाचाराची (domestic violence) फिर्याद देण्यासाठी मुलीबरोबर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police) आलेल्या सासूवर जावयाने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या हडपसरमध्ये समोर आलाय. माफी मागताना पाया पडण्याचे नाटक करत जावयाने सासूवर चाकूने हल्ला केला. यामध्ये सासू जखमी झाला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पायापडायचे म्हणत जावयाने चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारातच घडला. मात्र तिथे असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठी हानी टळली. या सर्व प्रकारात सासूच्या गालाला जखम झाली आहे. पोलिसांनी सासूला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मंगेश महादा तारे (29, वडगावशेरी) याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात पुष्पा दामोदर पालवे (46, महादेव नगर मांजरी) या जखमी झाल्या आहेत. तर सासरे दामोदर पालवे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगेश तारे आणि पूजा तारे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. पती मंगेश हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने पूजा आपल्या आईकडे आली होती. त्यानंतर त्या तक्रार देण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात आल्या असता मंगेश तिथे पोहोचला. आमच्या दोघांमध्ये कसलाही वाद नाही हे हे सांगण्याचा प्रयत्न करताना मंगेशने सासूच्या पाया पडण्याचे नाटक केले. यानंतर खाली वाकताच त्याने जर्किंगच्या खिशात भाजी कापण्याचा आणलेला चाकू अचानक बाहेर काढला आणि सासूवर वार करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, काही समजण्याआधीच हा प्रकार घडल्याने तिथे उपस्थित असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी मंगेशला रोखले व त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे मोठी हानी टळली. कौटुंबिक वाद मिटवल्याचे नाटक करत जावयाने सासूवर लपवून आणलेल्या चाकूने काही कळण्याच्या आत वार केल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र पोलीस उपनिरक्षकाच्या दक्षतेमुळे जावयाचा हल्ला करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button